4 दिवसात सोयाबीनला हवा तसा भाव देणार, भाजपच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

Soybean Price l विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात अनेक ठिकाणी सभा पार पडत आहेत. अशातच आता परांडा येथे आयोजीत केलेल्या महायुतीच्या सभेत भाजप नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

4 दिवसात तुम्हाला पाहिजे तसा सोयाबीनला भाव मिळणार :

परांडा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा परांडा येथे पार पडली आहे. या सभेत बोलताना कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनच्या दराबाबत शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं आहे.

सध्या सोयाबीन पिकाला भाव कमी आहे त्यामुळे तुमच्या मनात आमच्याबद्दल राग आहे. परंतु आता भाव कमी झाला म्हणून मी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना देखील भेटलो आहे. त्यामुळे आता येत्या 4 दिवसात तुम्हाला पाहिजे तसा सोयाबीनला भाव मिळणार असल्याचं वक्तव्य भाजप नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं आहे.

Soybean Price l तानाजी सावंत जादू दाखवतात – मुख्यमंत्री :

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तानाजीराव सावंत यांच्या प्रेमापोटी हे लोक आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरसभेत व्यक्त केलं आहे. त्यामुळे ही तानाजी सावंत यांच्या विजयाची सभा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

तसेच तानाजी सावंत यांनी किल्ल्याची राखण हाती घेतली आहे, परंतु आता त्याला खूप दिवस झाले आहेत. त्यामुळे त्यांचा नाद करायचा नाही. तसेच तानाजीराव हे जादूगार आहेत आणि ते जादू करतात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

News Title : Soybean Price increase in 4 days

महत्वाच्या बातम्या –

नरेंद्र मोदी महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार?

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नको त्या गोष्टी माझ्या तोंडी..”

‘अटक होऊ शकते म्हणून अजित पवारांनाही घाम फुटला होता’; खळबळजनक दावा समोर

मुख्यमंत्र्यांचं शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका