बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोयाबीनच्या भावात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा आजचा भाव

लातूर | राज्यात सर्वत्र सध्या सोयाबीनचा बोलबाला आहे. राज्यातील शेतकरी सोयाबीन काढणीत गुंतले आहेत. सोयाबीन शेतकऱ्यांच्या बांधावर आहे. पाऊस येत असल्यानं आधीच शेतकरी बेजार झाला आहे. त्यातच आता सोयाबीनचा भाव कोसळला आहे. परिणामी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

सोयाबीनची मोठी बाजारपेठ म्हणून लातूर जिल्ह्याला ओळखलं जात. लातूरात राज्यातून सोयाबीन विक्रीसाठी येत असतं. 18 सप्टेंबर दिवशी सोयाबीनचा भाव लातूरच्या बाजारात 8800 रूपये प्रति क्विंटल होता. एवढा भाव असल्याने यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असं वाटत होतं. पण 22 सप्टेंबरला सोयाबीनच्या भावात अचानक विक्रमी घसरण नोंदवली गेली आहे. 8800 वरून भाव थेट 5800 झाला आहे.

शेतकऱ्यांच्या पदरात यावर्षी सुद्धा कमी भावच पडणार याची चिंता शेतकरी करत आहेत. तब्बल 3000 हजार रूपये भाव कमी झाला आहे. सोयाबीन काढणीस सुरूवात झाली असताना हा झटका शेतकऱ्यांना बसला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. खाद्यतेल आयात शुल्कात घट केल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे.

सोयाबीन पेंडीची 12 मेट्रीक टनाची विदेशातून आयात करण्याचा निर्णय  केंद्र सरकारनं घेतला आहे. परिणामी बाजारभावात घट होताना पहायला मिळत आहे. मराठवाड्यात यावर्षी सोयाबीन पीक जोरात आलं आहे. पावसाचं योग्य प्रमाण आणि रोगराईचा प्रादुर्भाव कमी होता. पण बाजारभावाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे.

थोडक्यात बातम्या 

‘आपल्या लायकीनुसार नुकसानाची किंमत ठरते’; निलेश राणेंची राऊतांवर बोचरी टीका

“मी पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार, कारण त्यांची लायकी कोट्यावधींची नाही”

‘चंद्रकांत पाटलांच्या लेखणीला फेस…’; पाटलांनी अग्रलेखाला दिलेलं उत्तर राऊतांनी जसंच्या तसं छापलं!

“मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी करणाऱ्यांची कीव येते”

RBI ने लागू केले ‘हे’ नवीन नियम; 1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंटमध्ये होणार हा मोठा बदल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More