लोक म्हणतात, नोटा… नोटा… नोटा; आप आणि सपालाही टाकलं मागे

नवी दिल्ली| पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र या निवडणुकीतून काही धक्कादायक आकडेवारी देखील समोर आली आहे. 

लोकांचा ‘नोटा’ या पर्यायाकडे कल असलेला दिसून येत आहे. समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीपेक्षा देखील जास्त मतं नोटाला मिळाली आहेत. 

छत्तीसगढमध्ये 2.1 टक्के लोकांनी नोटाला पसंती दिली. या राज्यात ‘आप’ला 0.9 टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला 0.2 टक्के मतं मिळाली.

मध्य प्रदेशात ‘नोटा’ला 1.5 टक्के, सपाला 1.0 टक्के तर ‘आप’ला 0.7 टक्के मतं मिळाली.

राजस्थानमध्ये ‘नोटा’ला 1.3 टक्के, माकपला 1.3 टक्के, सपाला 0.2 टक्के, ‘आप’ला 0.4 टक्के आणि रालोदला 0.4 अशी मतं मिळाली.

दरम्यान, तेलंगणामध्ये 1.1 टक्के लोकांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला.

महत्वाच्या बातम्या 

-मोदींच्या सिंहासनाला तडा; राज ठाकरेंचा वर्मावर वार

-जिओच्या साम्राज्याला धक्का?; गुगलचा स्वस्तातला फोन बाजारात दाखल

-नरेंद्र मोदींनी युवकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत – राहुल गांधी

-RBI च्या नव्या गव्हर्नरनी केलं होत नरेंद्र मोदींच्या या सर्वात मोठ्या निर्णयाचं समर्थन

-कोण आहेत शक्तिकांत दास?