लखनऊ | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बसपा आणि सपा या दोन्ही पक्षांनी युती करत भाजपपविरूद्ध रणशिंग फुंकलं आहे. मात्र या युतीत त्यांनी काँग्रेसला सोबत घेतलेलं नाही.
मायावती-आखिलेशांनी काँग्रेस बरोबर केली युती नाही मात्र अमेठी आणि रायबरेलीत काँग्रेसला साथ देण्याचं ठरवलं आहे.2019 हे वर्ष भारतीय राजकारणात नवी राजकीय क्रांती घडवणार आहे, असं मायावती यांनी म्हटलं आहे.
बोफोर्स प्रकरणात काँग्रेसला सत्ता गमवावी लागली तशी भाजपला देखील राफेल प्रकरणामुळं सत्ता गमवावी लागेल, अशी चर्चा देशात सुरु आहेत, असं मायावती यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेससोबत युती केल्यास त्यांच्या पक्षांची मत आम्हाला मिळत नाहीत, त्यामुळं आम्ही त्यांच्याशी युती केली नाही, असं मायावती म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आमची युती झाल्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झाेप उडाली- मायावती
-“आलोक वर्मांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नाही, त्यांना हटवण्याचा निर्णय घाईगडबडीचा”
-“जे 60 वर्षात झालं नाही ते गेल्या साडे चार वर्षात झालं”
-दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर शहीद
-शिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे- रावसाहेब दानवे
Comments are closed.