पदोन्नतीच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारमध्ये ठिणगी; ‘या’ काँग्रेस मंत्र्याचा ठाकरे सरकारला इशारा
मुंबई | मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण होतं. मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी ठाकरे सरकारने पदोन्नतीत दिलं जाणारं आरक्षण मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मागासवर्गिय समाजात असंतोषाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. याच मुद्यावरून आता ठाकरे सरकारमध्ये ठिणगी पडली आहे. काँग्रेसने मागासवर्गिय आरक्षणास धक्का न लावण्याची भूमिका घेतली आहे.
काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पदोन्नीतील आरक्षणावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. नितीन राऊत यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. 2 दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर बैठक न लावल्यास मंत्रिमंडळ बैठकीत विषय उपस्थित करणार असल्याचं नितीन राऊतांनी सांगितलं आहे.
काँग्रेस नेहमीच मागासवर्गियांच्या सोबत राहिली आहे, मात्र मागासवर्गीयांसोबत जे सध्या चालू आहे ते आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या कानावर घालू, असं राऊत म्हणाले. मंत्रीमंडळातून बाहेर पडायचे की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाच्या हायकमांडचा आहे. मात्र काँग्रेस पक्षाला गृहित धरू नका, आम्ही तुमचे नोकरदार नाहीत, असा इशारा त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या कार्यशैली बद्दलही उघड नाराजी नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार जर मंत्रीमंडळ उपसमितीचे सर्व अधिकार आपल्यालाच आहे, असं समजत असतील तर हा उपसमितीचा अपमान असल्याची भूमिका नितीन राऊत यांनी मांडली आहे.
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्रातलं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”
‘पुण्यातील लहान मुलांचे लसीकरण करा’; बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिली महत्वाची सुचना
नियम मोडणाऱ्या वऱ्हाडींना पोलिसांनी शिकवला धडा, पहा काय घडलं..!
कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती
शहरी भागातील एक तृतीयांश लोकांच्या शरिरात कोरोना अँटीबॉडी; सिरो सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
Comments are closed.