बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना नारायण राणेंचा सावध पवित्रा, म्हणाले…

सिंधुदुर्ग | राज्यातील बहुचर्चित आणि चिपी विमानतळाच्या श्रेयवादासाठी दोन राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली. चिपी विमानतळाचा अखेर आज उद्घाटन सोहळा पार पडला. या विमानतळाच्या कार्यक्रमात नारायण राणेंनी जोरदार टोलेबाजी केली. राणेंनी राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना सावध पवित्रा घेतला आहे.

माझ्या दृष्टीनं आदित्य ठाकरे हे टॅक्स फ्री आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मी त्यांना शुभेच्छा देईन. उद्धवजींना अभिप्रेत असं काम आदित्य यांनी करून दाखवावं. मला आनंद होईल. मी सर्वांच स्वागत करतो, तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मला आनंद आहे. बरं वाटलं आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. आदित्यने अभ्यास करावा. त्यांनी टाटांचा अहवालही वाचावा, असा सल्ला नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

स्टेजवर मला कळलंच नाही की, कार्यक्रम कोणाचा आहे? काय प्रोटोकॉल आहे? मानसन्मान घ्या, प्रोटोकॉल जरूर पाळा, असा टोला राणेंनी शिवसेनेला लगावला आहे. या कार्यक्रमात नारायण राणेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना ऊजाळा दिला आहे.

दरम्यान, मला बाळासाहेबांनीच कोकणचा विकास करण्यासाठी पाठवलं होतं, असं राणेंनी बोलवून दाखवलं आहे. तसेच बाळासाहेबांनी खोट्या लोकांना थारा कधीच दिला नाही, असं सुद्धा राणे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

चिपी विमानतळावर राजकीय राडा; उद्धव ठाकरेंनी राणेंना मारले इतके टोमणे!

“शिवसेनेतील ‘या’ नेत्यांवर नजर ठेवा”; भरसभेत राणेंचा उद्धव ठाकरेंना खळबळजनक सल्ला

“कोकणच्या मातीत काही बाभळी जन्माला आल्यात”; पहिल्याच वाक्यात ठाकरेंचा प्रहार

“नजर लागू नये म्हणून काळं तीट लावावं लागतं, ती लावणारी लोकं इथं आहेत”

“लघू-सूक्ष्म का असेना तुमच्याकडे मोठं खातं”; उद्धव ठाकरेंकडून राणेंना कानपिचक्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More