बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजीव सातव यांच्याबद्दल बोलताना महाराष्ट्रातील ‘हा’ नेता ढसाढसा रडला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते व खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरू होती. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. पण त्यांच्या शरीरामध्ये एक नवा विषाणू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली.

काल अचानक राजीव सातव यांची तब्येत खराब झाली आणि आज सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, राजीव सातव यांच्याबद्दल आठवणी सांगत असताना महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना अश्रू आवरता आले नाही. राजीव सातव यांच्याबद्दल बोलत असताना विजय वडेट्टीवार हे ढसाढसा रडले.

“आम्हाला नेहमी राजीव यांचे मार्गदर्शन लाभले, दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस ज्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि ते प्रश्न सोडवावेत असा नेता आम्ही गमावला”, अशा भावना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या आहेत. यासंबंधी बोलत असताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यामुळेच त्यांना अश्रू अनावर झाले.

“वयाने छोट्या असलेल्या राजीव सातव यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन करायचं होतं तेव्हा मी नाराज होतो आणि माझी समजूत काढली होती”, असं विजय वडेट्टीवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना बोलून दाखवलं. “दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोलीसारख्या छोट्या जिल्ह्यातून राजीव सातव यांच्यासारखं नेतृत्व पुढे आलं आणि राहुल गांधींचा एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांचा हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे”, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

थोडक्यात बातम्या –

फेसबुकवरुन केलं तरुणीला प्रपोज, आई-वडिलांना भेटवण्याचं सांगून 25 मित्रांकडून गँगरेप

“राजीव सातव हे उभरतं नेतृत्व, मी संसदेतील चांगला मित्र गमावला”

कोरोना रुग्णाचा मृतदेह प्लॅस्टिकमधून काढणं आलं अंगलट, आता सारं गाव भोगतंय सजा!

भयंकर ! धुम्रपान करतानाच गाडीत सॅनिटायजर वापरलं; अन् झालं असं काही…, पाहा व्हिडीओ

व्यावसायिकासोबत शरीरसंबंध ठेवताना काढला व्हिडीओ, त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More