बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भागवतांनी हिंदू- मुस्लीम ऐक्यावर बोलणं म्हणजे RSSने सरड्याप्रमाणे रंग बदलणं”

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं होतं. गाझियाबाद या ठिकाणी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत केलेल्या वक्तव्यावरून आता संपुर्ण देशात चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत करत भागवतांवर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता उर्जामंत्री नितिन राऊत यांनीही मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे.

आज जेव्हा उत्तर प्रदेश, गुजरात अशा पाच राज्यांमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्यावेळी भागवतांनी हिंदु- मुसलमान एक आहेत असं बोलणं म्हणजे आरएसएस सरड्यासारखे रंग बदलत आहे हे दिसून येत आहे, अशी टीका उर्जामंत्री नितिन राऊत यांनी केली आहे. त्याच बरोबर त्यांनी कृषी कायद्यावर देखील आक्रमक भुमिका मांडली आहे. कृषी कायदा रद्द झालाच पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.

मोहन भागवातांनी हिंदु- मुसलमानांमध्ये मतभेद नाहीत, असं वक्तव्य भागवतांनी केलं. परंतु त्यांनी या गोष्टीचं उत्तर द्या की, ज्या मुसलमानांना गोस्टच्या नावाखाली मारण्यात आलं. ज्या मुसलमानांचा जीव झुंडशाहीने घेतला, त्यावर ते काहीच का बोलत नाहीत?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाही, एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेदाभेद करणं चुकीचं आहे. हिंदुस्थान हे एक राष्ट्र असून मुस्लिमांना आपली ओळख संपवण्याची किंवा नष्ट करण्याची काहीच गरज नाही. मुळातच हिंदू आणि मुस्लिम वेगळे नाहीत, असं मत मोहन भागवतांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

एमपीएसीच्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

‘अनिल देशमुख मला असंच मधात बोलले होते आता ते…’; मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ

‘स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या’; सुधीर मुनगंटीवारांची सरकारकडे मागणी

‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं’; प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

आता ‘या’ लसीची निर्मिती भारतात होणार ; DGCI कडून अधिकृत मान्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More