बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन

मुंबई | माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे विशेष अधिकारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून काम पाहणाऱ्या राम खांडेकर यांचं नुकतच निधन झालं आहे. राम खांडेकर यांचं मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. नागपूरच्या मुळगावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजकीय क्षेत्रातील घडामोडीवर दांडगा अभ्यास असलेल्या राम खांडेकर यांनी अनेक वृत्तपत्रात लिखान केलं आहे. त्याचबरोबर मासिकांमध्येही त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीवर त्यांनी 60 ते 70 विशेष लेख लिहिले आहेत. 1985 साली नरसिंहराव यांनी त्यांच्या रामटेक मतदारसंघाच्या नियोजनाची जबाबदारी खांडेकर यांच्याकडे सोपवली होती.

1991 मध्ये जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांचे विशेष अधिकारी म्हणून खांडेकर यांची नियुक्ती झाली. आपल्या राजकीय अनुभवावरून त्यांनी वृत्तपत्रात केलेल्या लिखानाचं ‘सत्तेच्या पडछायेत’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या ते जवळीक मानले जात होते. त्याचबरोबर सर्वच राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध देखील होते.

‘यशवंतराव चव्हाण साहेबांचा सहवास लाभलेले व माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन झाले. ते एका प्रदीर्घ व महत्वाच्या राजकीय कालखंडाचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. एका वर्तमानपत्रात त्यांनी याबाबत केलेले लिखाण यासंदर्भातील अनमोल ठेवा आहे’, अशा शब्दात ट्विट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! फक्त एवढ्या दिवसांत तब्बल 53 हजार रूग्ण कोरोनामुक्त

‘मुंबई पुण्याला तिसऱ्या लाटेचा धोका नाही’; तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ मोठं कारण

डाळिंब निर्यातीवर लॉकडाऊनची कुऱ्हाड; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली; मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजाचा राज्यव्यापी मोर्चा

वेल डन छेत्री! दिग्गज मेस्सीला मागे टाकत भारतीय सुनिल छेत्रीची दुसऱ्या स्थानी झेप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More