बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुजय विखेंचा गनिमी कावा, स्पेशल विमानानं दिल्लीहून 10 हजार रेमडेसिवीर आणली!

अहमदनगर | भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी थेट दिल्लीवरुन रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा आणलाय. डाॅ. सुजय विखे यांनी सोमवारी खाजगी विमान करुन तब्बल 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स नगरकरांसाठी आणली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहे. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं डाॅ. सुजय विखे म्हणाले आहेत.

ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचं राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती, असंही सुजय विखे या व्हिडीओत म्हणाले आहेत. त्यांनी शनिवारी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली आहे.

मी गेलो फॅक्टरीत होतो. तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला होता. त्यांच्याकडून मी मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असंही डाॅ. सुजय विखेंनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

“उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, पण सीबीआयने धाडच टाकली”

आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली…

‘रोज उठून त्यांचं नाटक चाललंय’; चंद्रकांत पाटील संजय राऊतांवर भडकले

कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी मंत्र्यांच्या पोरांचं ‘एक पाऊल पुढे!’

न्या. एन. व्ही. रमणा भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More