अमृता फडणवीसांची शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणतात लोकप्रिय मुख्यमंत्री…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचा गुरूवारी वाढदिवस आहे. यानिमित्तानं राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियावरही कमेंट्सच्या माध्यमातून नेटकरी शिंदेंना शुभेच्छा देत आहेत.

आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnvis) यांनीही शिंदेंना सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता यांनी शिंदे आणि त्यांच्या पत्नीसह त्या असलेला एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभावे या शुभकामना.

दरम्यान, अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचं ‘आज मैने मूड बना लिया’ हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याला अल्पावधीतच प्रचंड लाईक्स मिळाल्या होत्या.

तसेच त्यांनी आज मैने मूड बना लिया या गाण्यावर रियाज अलीसोबत रील बनवल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केलं होतं. तसेच ती रील शासकीय बंगल्यावर बनवली आहे, असा आरोप हेमा पिंगळे यांनी त्यांच्यावर केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-