बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

थेट मैदानात घुसून प्रेक्षकांचा राडा! फुटबाॅल सामन्यावेळी धक्कादायक घटना; पाहा व्हिडीओ

पॅरिस | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांंपासून जगभरातील अनेक खेळांवर निर्बंध लादण्यात आले होते. भारतात प्रसिद्ध असलेली आयपीएल देखील कोरोनामुळे स्थगित करण्यात आली. आता हळूहळू जगभरात क्रीडा मालिका सुरू झाल्या आहेत. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली नाही. परंतु, काही ठिकाणी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात येत आहे. अशातच आता एका सामन्यावेळी धक्कादायक घटना घडली आहे.

फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरात ‘लीग 1’ ही जगप्रसिद्ध फुटबाॅल मालिका खेळवण्यात येत आहे. Nice विरूद्ध Marseille यांच्यात सामना खेळला जात होता. दोन्ही संघाने आक्रमक खेळी करत सामना रंगतदार स्थितीत आणला. सुरूवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व ठेवलेल्या Nice संघाने 1 गोल करत सामन्यात आपलं वर्चस्व कायम केलं. मात्र, सामना अखेरच्या टप्प्यात पोहचला असतानाच मैदानात मोठा घटना घडली.

Marseille संघाचा दिमित्री पेयेट हा 74 व्या मिनिटाला काॅर्नर किक घेण्यासाठी आला. त्यावेळी Niceच्या चाहत्यांनी त्याच्या अंगावर पाण्याची बाटली फेकली. प्रेक्षकांच्या कृत्यामुळे दिमित्रीला राग आला. त्याने ती बाटली प्रेक्षकांकडे भिरकली. त्यानंतर Niceचे चाहते नाराज झाले आणि थेट मैदानात घुसून राडा घातला. प्रेक्षकांनी मैदानात येत हाणामारी केली. यात दिमित्री पेयेट हा खेळाडू जखमी झाला आहे.

दरम्यान, काही लोक मैदानात उतरल्यानंतर खेळाडूंनी प्रेक्षकांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी मैदानात धाव घेतली. त्यानंतर काही क्षणातच मैदान खेळाडू, प्रेक्षक आणि सुरक्षारक्षकांनी भरून गेलं. झालेल्या या सर्व प्रकारानंतर सामना थांबवण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

नीती आयोगाच्या ‘त्या’ गंभीर इशाऱ्यावर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

‘तहसीलदार मॅडम ‘तो’ विचार डोक्यातून काढून टाका’; अण्णा हजारेंचा तहसीलदारांना मोलाचा सल्ला

महेश मांजरेकर कॅन्सरग्रस्त! प्रकृतीबाबत आली ‘ही’ मोठी माहिती समोर

तुमच्याजवळ फाटलेल्या नोटा आहेत?, वाचा कशा बदलाल या फाटलेल्या नोटा?

भाजप मंत्र्याचा कारनामा; जिवंत सैनिकाला वाहिली श्रद्धांजली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More