Top News महाराष्ट्र मुंबई

‘महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी’; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे यासंदर्भात मागणी केली आहे.

मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे यशोमती ठाकूर यांनी विशेष बससेवा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

बसने प्रवास करण्याकरिता दररोज तास-दोन तास बसची प्रतीक्षा तसेच बस उपलब्ध झाल्यानंतरही त्यांना दोन-तीन तास प्रवास बसने करावा लागत आहे. विशेषतः महानगरामध्ये बसने येण्याजाण्यास खूप अडचणी येत आहे. तसेच बससेवेला होत असलेली गर्दी पाहता त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.

दरम्यान, महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय आणि खाजगी आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाईनलाच!

“सर्व खासगी रुग्णालये यापुढे सरकारनेच चालवावी”

मुंबई महापालिकेला खिसा करावा लागणार खाली?; नुकसान भरपाई म्हणून कंगणाने मागितले इतके कोटी

“हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?”

मी जाहीर करतो की आजपासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे- मदन शर्मा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या