‘सुशांतसिंह राजपूतचा आत्मा…’; आध्यात्मिक गुरू डॉ. मनमीतकुमार यांचा खळबळजनक दावा

Spiritual Guru Dr Manmeetkumar big claims about Sushant Singh Rajput Soul

Sushant Singh Rajput | अभिनेता सुशांतसिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) २०२० मध्ये वांद्रे (Bandra) येथील घरी आत्महत्या (Suicide) केली. या घटनेनंतर अनेक वादविवाद झाले, तर्क-वितर्क लढवले गेले, पण अद्याप या प्रकरणाचा उलगडा झालेला नाही. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे.

चाहत्यांच्या मनातील सुशांत

सुशांतसिंह राजपूत हा टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील (Film Industry) लोकप्रिय अभिनेता होता. त्याच्या निधनाला इतकी वर्षे उलटूनही चाहत्यांच्या मनातील त्याचे स्थान अबाधित आहे. गेल्या चार वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, पण ठोस पुरावा मिळालेला नाही. सुशांतचे कुटुंबीय न्यायासाठी लढत आहेत. सुशांतची बहीण अनेक मुलाखतींमध्ये सांगते की तिला आजही सुशांतचे अस्तित्व जाणवते, तो आसपास असल्याचा भास होतो.

डॉ. मनमीतकुमार यांचा अनुभव

आध्यात्मिक गुरू, सायकिक आणि मीडियम म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. मनमीतकुमार (Dr. Manmeetkumar) यांनी त्यांच्या यूट्यूब (YouTube) चॅनेलवर सुशांतसिंह राजपूतच्या आत्म्यासोबत झालेल्या संवादाबद्दल सांगितले. पॉडकास्टमध्ये (Podcast) मनमीत कुमार यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून सुशांतसिंह राजपूतचा आत्मा त्यांच्याकडे येत आहे.

सुशांतचा आत्मा शेजारी बसलेला

सुशांतसिंह राजपूतच्या आत्म्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीबद्दल त्या म्हणाल्या की, योगा करताना प्राणायम संपल्यावर जेव्हा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांच्या शेजारी सुशांतचा आत्मा बसलेला होता.

डॉक्टर सुरुवातीला घाबरल्या

मनमीत यांनी सांगितले की, सुशांतचा आत्मा शांतपणे प्राणायम संपेपर्यंत वाट पाहत होता. डोळे उघडल्यावर त्या सुरुवातीला घाबरल्या, पण नंतर त्यांना तो सुशांतचा आत्मा असल्याचे लक्षात आले. (Sushant Singh Rajput)

‘माझी गोष्ट का सांगत नाहीस?’

डॉक्टर मनमीतकुमार यांनी सांगितले की, सुशांतचा आत्मा त्यांना म्हणाला, “माझी कहाणी तू अजून लोकांना का सांगत नाहीस?” सुशांतची इच्छा आहे की कोणीतरी त्याच्यावर पुस्तक लिहावे, त्याचे सत्य बाहेर आणावे आणि ते प्रकाशित करावे.

 Title : Spiritual Guru Dr Manmeetkumar big claims about Sushant Singh Rajput Soul

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .