बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा करावा”

मुंबई | महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालमत्ता जप्त केल्याचा आरोप केला आहे. आयकर विभागाने भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची 100 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमय्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांची 100 कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचं सोमय्या म्हणाले होते. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांच्या मालमत्तेच्या व्यवहारात छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा काहीही संबंध नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे यांनी दिली आहे.

भाजपचे नेते सतत महाविकास आघाडीतील नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. खंर तर किरीट सोमय्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, अशी टीकाही तापसे यांनी सोमय्यांवर केली आहे.

दरम्यान,  राजकारण करावं त्याबद्दल कुणाचं दुमत नाही, परंतु राज्यात वस्तुस्थिती काय आहे. हे सर्व समजून घेऊन आरोप केलेत तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचा कटकारस्थान ताबोडतोब थांबवावं, असा इशाराही तापसे यांनी किरीट सोमय्यांना दिला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन!

मोठी बातमी- ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने केली मोठी घोषणा

“शरजील उस्मानीला आणला का शोधून पाताळातुन?”

राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य शोधलं, राडा होणार!

“सत्तर वर्षांची कमाई मोदींनी विकून टाकली”, पाहा राहूल गांधींचा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More