बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाद की नाबाद?, पंचांनी दिलेल्या निर्णयावर क्रीडाप्रेमी नाराज

चेन्नई | आयपीएल हंगामातील 13वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चालू असलेल्या सामन्यात तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयाने क्रीडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला दिल्लीने 137 धावांवर रोखलं.

दिल्लीचा संघ फलंदाजी करत असून सामन्याच्या पहिल्याच षटकात दिल्लीचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा झेल उडाला तो झेल मुंबईच्या हार्दिकने उत्कृष्टरित्या टिपला. मैदानावरील पंचांनी बाद दिलं होतं मात्र तिसऱ्या पंचानी नाबाद निर्णय दिला.

पांड्याने झेल पकडला तेव्हा त्याच्या हाताची बोट चेंडूच्या खाली असताना दिसत आहेत. मात्र पुसट चित्रामुळे पंचांनी नाबाद निर्णय देणं पसंत केलं. मात्र याचा मुंबईला फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या 137 धावसंख्येचा बचाव करताना दिल्लीच्या विकेट घेणं मुंबईसाठी महत्त्वाचं आहे. त्यात शिखर धवनसारख्या फलंदाजाची विकेट न मिळणं हे सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतं.

दरम्यान, मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 137 धावा केल्या आहेत. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. अमित मिश्राच्या फिरकीसमोर मुंबईच्या गोलंदाजांनी लोटांगण घातलं. रोहित शर्मानंतर मुंबईने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. दिल्लीकडून अमित मिश्राने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

थोडक्यात बातम्या- 

“देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं असेल तर….”; नरेंद्र मोदींनी राज्यांना केलं हे आवाहन

जगात सर्वाधिक वेगाने लसीकरण हे भारतात होत आहे- नरेंद्र मोदी

अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नव्हे- जितेंद्र आव्हाड

भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांचं पितळ उघडं पाडणार- नवाब मलिक

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू होणार, मुख्यमंत्री करणार घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More