खेळ

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला केंद्र सरकारची मान्यता, ‘या’ तारखेला होणार फायनल

नवी दिल्ली | आयपीएलचा 13 वा मोसम युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएलची गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक झाली. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, आयपीएलला भारत सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार आयपीएलचं अंतिम वेळापत्रक तयार झालं आहे. आता आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान UAE मध्ये खेळवली जाणार आहे. त्यानुसार 10 नोव्हेंबर रोजी फायनल मॅचचं आयोजन करण्यात आलंय.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅच पाहण्यासाठी फॅन्स आले तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यास नक्कीच मदत होईल. मात्र तरीही आम्ही खेळाडूंच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार आहोत. या सर्व गोष्टींवर योग्य वेळी चर्चा करण्यात येईल. आम्ही व्हिसा प्रक्रियेसाठी सुरुवात करण्यासही सांगण्यात आलंय.

गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएल स्पर्धेबाबत संभ्रामवस्था निर्माण झाली होती. मात्र, आता भारत सरकारच्या क्रिडा मंत्रालयाने परवानगी दिल्याने सर्व चर्चांना पुर्णविराम मिळालाय. या स्पर्धेसाठी VIVO ही चिनी मोबाईल कंपनीच मुख्य स्पॉन्सर कायम राहणार असल्याचा निर्णय गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठीकीत घेण्यात आलाय.

टी-20 वर्ल्डकप आयसीसीने पुढे ढकलल्यानंतर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर आयपीएल युएईमधील दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन मैदानांवर ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, BCCI नं महिलांचं IPL देखील खेळवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीये.

महत्वाच्या बातम्या-

बिग बींची कोरोनावर मात, अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल- संजय राऊत

महिला क्रिकेटपटूंसाठी IPL ची घोषणा लवकरच करणार- सौरव गांगुली

धक्कादायक! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

‘….तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो’; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या