बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जय शहांचा ‘तो’ फोटो तुफान व्हायरल; दिग्गजांनी केली सडकून टीका

नवी दिल्ली | गत काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) वाद वाढत चालला आहे. कर्णधापदावरून डच्चू दिल्यानंतर विराट कोहली (Virat Kohali) आणि भारतीय क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Saurav Ganguly) यांच्यात वाद वाढल्याचं सध्यातरी दिसत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्या फोटोवरून बीसीसीआय कोणाच्या इशाऱ्यावर चाललीयं अशी चर्च रंगली आहे.

विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यापुर्वी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. विराट कोहली आणि सौरव गांगुली या दोघांच्या बोलण्यात बराच फरक दिसून आला. अशातच बीसीसीआयचा एक फोटो व्हायरल  झाला आहे. या फोटोत बीसीसीआयचे सचिव जय शहा खुर्चीवर बसले आहेत आणि सौरव गांगुलीसह इतर पदाधिकारी उभे ठाकले आहेत.

सध्या सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. चित्रपट दिग्दर्शक विनोद कापरी यांनी हा फोटो शेअर करत जय शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय क्रिकेटच्या अस्ताला सुरूवात झाली आहे हे हा फोटो पाहिला की लक्षात यायला लागतं, असं कापरी म्हणाले आहेत. त्याचसोबत अनेक खेळाडूंनी देखील यावर टीका केल्याचं पहायला मिळालं आहे.

दरम्यान, सप्टेंबरमध्ये विराट कोहलीनं ट्वेंटीच्या कर्णधापदाचा राजीनामा दिला होता. तेंव्हाच त्यानं वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णाधारपदी कायम राहण्याचा मानस बोलून दाखवला होता. पण अचानक असं काय झालं की बीसीसीआयनं कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकलं आहे.

थोडक्यात बातम्या 

OBC Reservation! निवडणूक आयोगाचा ठाकरे सरकारला मोठा दणका

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

खुशखबर! ‘या’ वर्षात कोरोना नष्ट होणार; WHOच्या संशोधकांचा दावा

“विरोधी पक्षातील नेत्याने आवाज उठवला तर चार दिवसांनी त्याचं प्रेत आढळतं”

दिलासादायक! Omicronवर प्रभावी ‘या’ गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More