बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वात जास्त प्रभावी मानली जाणारी ‘ही’ लस भारतात दाखल, जाणून घ्या कधीपासून मिळणार

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. अशात भारतीयांसाठी चांगली बातमी आली आहे. कोरानावर सर्वात जास्त प्रभावी मानली जाणारी स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली आहे.

रशियाने विकसित केलेली स्पुटनिक ही लस भारतात आली आहे. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, निती आयोग यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. पॉल बोलत होते.

आतापर्यंत भारतात जवळपास 18 कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत 26 कोटी डोस देण्यात आले आहेत. तर या क्रमवारीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.

ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये भारत आणि भारतीयांसाठी 216 कोटी लसींचं उत्पादन करण्यात येईल. त्यामुळे कोरोनावरील लस ही सर्वांसाठी उपलब्ध होईल यात शंका नाही, असा विश्वासही व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या- 

सोलापूरची तरुणी स्वत:च्या पॅाकेटमनीमधून करते असं काम की अभिमान वाटेल!

कपडे वाळत घालण्यावरुन झालेल्या भांडणाने गाठलं टोक; घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

मोठी बातमी! 27 जूनला होणारी UPSC परीक्षा रद्द, नवी तारीख जाहीर

मुंबईत महिलेचा मृतदेह आढळला, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यानं खळबळ

“मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबाची तर पवारांना बारमालकांची काळजी, सामान्य माणसा तुच तुझा वाली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More