Top News देश विदेश

भाजप श्रीलंकेत सत्तास्थापन करणार; श्रीलंकेने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

Photo Courtesy- Instagram/@amitshahofficial

कोलंबो | श्रीलंकेत सत्तास्थापन करण्याच्या अमित शहांच्या तथाकथित वक्तव्याला श्रीलंकेने चांगलंच मनावर घेतलं आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष निमल पुंचीहेवा यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षाने श्रीलंकेत राजकीय विस्तार करण्याच्या बातमीवर प्रकाश टाकला आहे.

आमच्या देशातील निवडणूक कायदा अशा प्रकारच्या व्यवस्थेस परवानगी देत ​​नाही. त्यामूळे भाजपचा इथे सत्तास्थापन करण्याचा काही संबंधच येत नाही, असं पुंचीहेवा यांनी म्हटलं आहे

श्रीलंकेत असणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा गटाला परदेशातील कोणत्याही पक्षाशी बाह्य संबंध ठेवण्याची परवानगी आहे. पण आमचे निवडणूक कायदे परदेशी राजकीय पक्षांना येथे काम करण्याची परवानगी देत ​​नाहीत, असं त्यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे आसामचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करण्याची योजना असल्याचं बोलून दाखवलं होतं. 2018 ला एका चर्चेत आपण देशातील जवळपास सर्वच राज्यात सत्ता स्थापन केली आहे, आता फक्त शेजारील नेपाळ आणि श्रीलंका राहिल्याचं शहांनी बोलून दाखवलं असल्याचं आगरतळा येथे आयोजित एका कार्यक्रमात विप्लव देव यांनी सांगितलं होतं, मात्र या गमतीशीर वक्तव्याला श्रीलंकेने चांगलंच मनावर घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!

रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांकडून मंत्रिपदाचा राजीनामा?

प्यार किया तो डरना क्या?, ‘त्या’ दोघींनी त्याची चक्क वाटणी करुन घेतली

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या