बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2011 च्या विश्वचषकात गंभीरचा 97 धावांवर बोल्ड काढणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई | 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची विकेट घेणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू आणि माजी कर्णधार थिसारा परेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने याबाबतचे पत्र श्रीलंका क्रिकेटला (SLC) पाठवलं आहे.

श्रीलंका क्रिकेटचे निवडकर्ता थिसारा परेरासह अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंना एकदिवसीय संघातून वगळणार असल्याचे वृत्त होते. या चर्चेनंतर परेराने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. परेरा फ्रेंचायझी क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे.

मी सात वर्ल्डकप स्पर्धांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करू शकलो हे माझे भाग्य होते. तसेच मी बांगलादेशमध्ये झालेल्या 2014 टी-20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीलंकन संघाचा भाग होतो आणि भारताविरुद्ध अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या विजयात योगदान दिल्याचा अभिमान आहे. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण होता, असं परेराने पत्रात म्हटलं आहे.

परेराने सहा कसोटी 166 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केलं. तसेच त्याने श्रीलंकेचे कर्णधारपदही भूषवलं होतं. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी तो फ्रेंचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे. थिसारा परेराने काही दिवसांपूर्वी, एका स्थानिक सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. परेराने आर्मी स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना ब्लूमफिल्ड विरूद्ध ऐतिहासिक खेळी खेळली होती. एका षटकात सहा षटकार मारणारा परेरा हा श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला होता.

 

थोडक्यात बातम्या- 

नवरा-बायकोनं केक कापला, पुढं पोलीस आले अन् जेलमध्ये टाकलं, कारण धक्कादायक

कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोदींनी केली मोठी घोषणा!

पब्लिसिटीसाठीच काम करेन असं वागणं बरं नव्हं- नवाब मलिक

मन हेलावून टाकणारा फोटो; कोरोना मुक्त झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी

‘पराभूत झालो तरी…’; पराभवानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More