Top News खेळ देश विदेश

क्रिकेटमध्ये सेक्स स्कँडल?; 20 वर्षीय क्रिकेटपटूला रंगेहाथ पकडल्यानं खळबळ

कोलंबो | श्रीलंका क्रिकेट संघात सेक्स स्कँडल घडल्याचा दावा स्थानिक माध्यमांमधून केला जात आहे. असा काहीच प्रकार घडला नसल्याचं श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं सांगितलं असलं तरी या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश मात्र दिले आहेत.

श्रीलंकन क्रिकेट संघाच्या मॅनेजमेंटमधील एक तरुणी २० वर्षीय क्रिकेटरच्या खोलीत आढळून आली होती. इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना तोंडावर असताना हा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या तरुणीसोबत खेळाडू अशा अवस्थेत सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही श्रीलंकन क्रिकेट संघातील दुसऱ्या काही खेळाडूंसोबत हा प्रकार घडला होता, मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं याकडे कानाडोळा केला होता.

आता दुसऱ्या कसोटीसाठी खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवण्यात आलं आहे जे सोडण्याची परवानगी त्यांना नसते, त्याच हॉटेलच्या रुममध्ये हा प्रकार घडल्यानं श्रीलंका क्रिकेट संघ अडचणीत सापडला आहे.

थोडक्यात बातम्या-

“झाडाचं पान का पडलं म्हणूनही भाजप आंदोलन करू शकतं त्यामुळे आम्ही फारसं लक्ष देत नाही”

शाळा सुरु होण्याची तारिख बदलली; आता ‘या’ तारखेला भरणार वर्ग!

“…तर पवार साहेब ‘सीरम’मध्ये वशिला लावतील”

‘बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यु दाखवा अन्…’; बर्ड फ्लूच्या अफवा रोखण्यासाठी दुग्धविकास मंत्र्यांची आयडियाची क्लपना

आघाडीत बिघाडी करायची नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या