बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी! महिंदा राजपक्षेंचा राजीनामा

कोलंबो | श्रीलंकेचा पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेला महागाईच्या खाईत ढकलणाऱ्या व्यवस्थेचा शेवट झाला आहे. महिंदा राजपक्षेंच्या काळात श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली आहे.

जागतिक पातळीवर अनेक वित्तीय संस्थांनी आता श्रीलंकेला दिवाळखोरीत काढलं आहे. अशात ज्यांच्या निर्णयामुळं सर्वाधिक फटका बसला ते राजपक्षे अखेर पायउतार झाले आहेत. परिणामी जगातील अनेक देशांची आणि श्रीलंकेतील विरोधकांची मागणी मान्य झाली आहे.

दिवसेंदिवस ढासाळत चाललेल्या परिस्थितीमुळं श्रीलंकेत परत एकदा आणिबाणी लागू करण्यात आली आहे. परिणामी आता श्रीलंकेतील स्थिती सामान्य होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशातच श्रीलंकेतील नागरिक महागाईनं त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, राजपक्षे सरकारमधील इतर मंत्र्यांनी अगोदरच आपले राजीनामे दिले आहेत. आता महिंदा राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर नवीन मंत्रीमंडळ लवकरच कार्यान्वित होणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

सत्र न्यायलयाचा राणा दांपत्याला दणका; अटींचं उल्लंघन अंगलट येणार?

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

…अन् संजय राऊत आणि अजित पवार आपापसातच भिडले

काय सांगता? सोनाक्षी सिन्हाने गुपचूप साखरपुडा उरकला? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More