नागपूरला देशाची राजधानी बनवा; श्री श्री रविशंकर यांची मागणी

नागपूर | प्रदूषणाच्या भयंकर विळख्यामुळे देशाची राजधानी असलेली दिल्ली मोठ्या संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी देशाची राजधानी दिल्लीला हलवण्याची मागणी केलीय. 

नागपूरला का देशाची राजधानी बनली जाऊ नये? नागपूर देशाच्या मध्यभागी असल्याने सर्वांना जाण्या-येण्यासाठी बरं पडेल, असं ते म्हणाले. ‘अंतरंग वार्ता’ या अनुयायांच्या बैठकीत ते बोलत होते. 

दरम्यान, नागपूर नाही जमलं तर नागपूरच्या आजूबाजूलाही नवं शहर निर्माण करता येऊ शकतं. आपले पंतप्रधान डायनॅमिक आहेत. ते हे करु शकतात, असंही श्री श्री रविशंकर म्हणाले.