पालघरमध्ये मोठा राजकीय ड्रामा, आता संपूर्ण वनगा कुटुंब बेपत्ता

Srinivas Vanaga Family Missing l विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. अशातच पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना देखील उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. मात्र त्यांची उमेदवारी वगळताच ते बेपत्ता झाले होते. यावेळी बराच वेळ नॉट रिचेबल असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा शोध पोलिसांकडून देखील घेतला. मात्र 36 तासांनंतर श्रीनिवास वनगा यांचा शोध लागला आहे.

वनगा यांच्यासोबत त्यांचे कुटुंब देखील गायब :

अशातच आता पुन्हा श्रीनिवास वनगा यांसंदर्भात खळबळजनक माहिती समोर आली आहे. श्रीनिवास वनगा यांच्यासोबतच त्यांचे कुटुंब देखील गायब झाले आहे. आता विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या घरी कोणी नसल्याने त्यांच्या घराला कुलूप असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आमदार श्रीनिवास वनगा यांचे घर बंद आहे.

याशिवाय आता त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे. मात्र आमदार श्रीनिवास वनगा व त्यांचे कुटुंबिय घरी नसल्याने हे सर्वजण नेमके गेले कुठे असा प्रश्न देखील उपस्थितीत होत आहे. मात्र आता त्यांचे कुटुंन घरी नसल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Srinivas Vanaga Family Missing l कार्यकर्ते टेन्शनमध्ये :

विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं शिंदे गटाकडून तिकीट कापण्यात आलं आहे. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते डिप्रेशनमध्ये असल्यामुळे घर सोडून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना दिली होती. याशिवाय त्यांची प्रकृती देखील ठीक नसून त्यांना आरामाची गरज असल्याने वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले असल्याचे समजत आहे.

याशिवाय श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांची वर्षा बंगल्यावर जाण्याची इच्छा नसल्याचे देखील त्यांच्या पत्नीने स्पष्ट केले आहे. मात्र आता अचानकपणे श्रीनिवास वनगा यांचं कुटुंब गायब झाल्याने पुन्हा एकदा शिंदे गटासह त्यांच्या कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढलं आहे.

News Title –Srinivas Vanaga Family Missing 

महत्त्वाच्या बातम्या-

लाडकी बहीण योजना बंद…’या’ नेत्यानी केला मोठा दावा?

नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार! पाहा सुट्ट्यांची यादी

“बारामतीकर सुज्ञ आहेत, ते मलाच निवडून देतील”; अजितदादांना ठाम विश्वास

शरद पवारांनी केलेली ‘नक्कल’ अजितदादांच्या जिव्हारी लागली! अजित पवार म्हणाले…

राज्यात 288 आमदार पदासाठी तब्बल ‘इतके’ अर्ज दाखल