लातूर | लातूरच्या सृष्टी जगताप या नऊवीत शिकणाऱ्या मुलीने सलग 24 तास लावणी करत नवा रेकॉर्ड केला आहे. 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्यादिवशी दुपारी 4.30 वाजता सृष्टीने लावणीच्या सादरीकरणास सुरूवात केली.
सृष्टीने मंगळवारी चालू केलेलं नृत्यसादरीकरण बुधवारी दुपारी 4.30 वाजता थांबवलं. सृष्टीने सलग 24 तास नृत्य करत विक्रम केला आहे. या विक्रमाची एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या पराक्रमानंतर सृष्टीच्या आई-वडिलांसह लातूरच्या दयानंद सभागृहातील उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
सृष्टीने याआधीही सलग 12 तास लावणी केली आहे. सृष्टी पोतदार स्कुलमध्ये नऊवीत शिकत शिकते. तिचे आई-वडील सुधीर जगताप आणि आई संजीवनी जगताप हे शिक्षक आहेत तर सृष्टीला आणखी एक बहिण आहे.
दरम्यान, सृष्टीने दुरदर्शनवरील ‘दम दमा दम’ या कार्यक्रमात 2012 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. 2012 मध्ये ‘दम दमा दम’ मध्ये विजेतेपद पटकावलं तेव्हा ती पाच वर्षाची होती. सध्या सृष्टीने केलेल्या पराक्रमामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुस्लीम प्रशासकांच्या काळातील सर्व अपवित्र नावं आम्ही बदलणार”
विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाचा दणका; पाहा काय आहे प्रकरण…
‘…तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का’; राष्ट्रवादीचा शेलारांवर पलटवार
‘गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा’; अजित पवारांच्या बापटांना कोपरखळ्या!
‘अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन’; ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप