नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणत्याही एका विचारधारेत बांधलं जाऊ शकत नाही. भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ‘द आरएसएस : रोडमॅप फॉर ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
संघाची विचारसरणी म्हणून काहीही बोलणं किंवा एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं चुकीचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनीही आपल्याला संघ पूर्णपणे समजला आहे, असं कधीही म्हटलं नाही. इतके दिवस सरसंघचालक राहिल्यानंतर गुरुजी म्हणाले की मला कदाचित संघ समजण्यास सुरुवात झाली असेल, असंही भागवत यांनी म्हटलं.
आत्तापर्यंत संघाने चर्चा केली नसली तरी प्राचीन इतिहासात काही व्यक्तींचा समाजनिर्मितीत समावेश होताच. महाभारतामध्ये या व्यक्ती महायुद्धात उतरल्या. रणांगणात उतरून त्यांनी स्वत:चे योगदान दिले, असं भागवतांनी सांगितलं.
समाजातील त्यांचे स्थान मोठी समस्या नाही. त्यांच्याशी आपलेपणाने वागले तर हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. या विषयाला संघ हात लावेल वा लावणार नाही. कदाचित भविष्यात या विषयावर चर्चा करण्याची गरजही उरणार नाही, असं मत भागवत यांनी मांडलं.
महत्वाच्या बातम्या-
“…म्हणून भाजपाला मोठा घास द्यावा लागला” – https://t.co/ntsqm8XJNE @BJP4Maharashtra @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
नितेंश राणेंच्या ‘त्या’ ट्वीटमुळे राजकारणात खळबळ – https://t.co/sGs4uMkcMD @NiteshNRane
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या; ‘या’ नेत्याचा निवडणूक लढण्यास नकार- https://t.co/2PCOsKU6OY #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
Comments are closed.