बीड महाराष्ट्र

या पठ्ठ्याचा नाद खुळा! सर्व विषयांमध्ये मिळवले 35 गुण…

बीड | बीडमधील माजलगाव तालुक्यातील एका विद्यार्थ्याने सर्वच विषयात 35 गुण मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. धनंजय नारायण नखाते असं या 35 टक्के गुण घेणार्‍या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याचे वडील मजुरीचं काम करतात.

मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत धनंजयने सर्वच 6 विषयात काठावरचे म्हणजेच 35 गुण मिळवले आहेत. त्याला एकूण 500 गुणांपैकी 175 गुण मिळाले आहेत.

सर्वच विषयात 35 मार्क घेणारा धनंजय जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 35 मार्क घेऊन देखील धनंजय नखाते याने चर्चेतून गावाचे नाव मोठं केल्याने, गावकऱ्यांनी त्याचं अनोखं स्वागत करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला.

महत्वाच्या बातम्या-

डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ कॉलेजला १२ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर

मुंबई पोलिसांना कोविड-१९ प्रादुर्भाव संपेपर्यंत…. गृहमंत्री अनिल देशमुखांचा मोठा निर्णय

कोरोना संसर्गाचा धोका ‘या’ सवयीमुळे वाढत आहे; आरोग्य मंत्रालयाची माहिती

‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या

आईनं धुणीभांडी करून शिकवलं; पोरानं आईच्या कष्टाचं चीज करुन दाखवलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या