फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत मोठा बदल, आता..

10th Board Exam

SSC Exam 2025 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंबंधी मंडळाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या आगामी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ जाहीर करण्यात आली होती. आता दहावीबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. (SSC Exam 2025)

दहावीच्या विद्यार्थ्यांना नव्या सुधारीत वेळापत्रकानुसार 6 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. त्यानंतरचे दहा दिवस म्हणजेच 20 ते 30 नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येतील, अशी माहिती बोर्डाने दिली आहे.

दहावी परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

नियमित आणि प्रचलित अशा दोन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहेत. सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. तर, पुनर्परीक्षार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालयातर्फे प्रचलित पद्धतीने भरायचे आहेत.हे अर्ज भरण्यासाठी आता दोन आठवड्यांची वाढ करत मुदतवाढ देण्यात आली आहे. (SSC Exam 2025)

दरम्यान, मंडळाकडून शाळांनाही काही सूचना करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे अनिवार्य करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहितीची पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री करुन घेण्याची जबाबदारीही शाळांचीच असणार आहे. तसेच, अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट 4 डिसेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे द्याव्या लागणार आहेत.

दहावी-बारावी परीक्षेच्या नियोजित तारखा

बारावी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
दहावी परीक्षा : 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 (SSC Exam 2025)

News Title – SSC Exam 2025 Application Deadline Extended

महत्त्वाच्या बातम्या-

फडणवीसांनी ईडीचा डाव लावताच गोपाळरावांचा आव, ताव आणि भाव कोसळला!

बॉलीवूडवर शोककळा! ‘गदर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

“मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?”

आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येणार!

कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; सतेज पाटलांना मोठा धक्का

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .