दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

10th Exam Paper Leak

SSC Exam Hall Tickets | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्चमध्ये (February-March) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) सोमवार, दि. २० जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. (SSC Exam Hall Tickets )

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी हॉल तिकीट प्रिंट (Print) करून विद्यार्थ्यांना (Students) देण्याच्या सूचना (Instructions) देण्यात आल्या आहेत. तसेच, यासाठी कोणतेही वेगळे शुल्क (Fees) आकारू नये, असे राज्य शिक्षण मंडळाने (State Board of Education) स्पष्ट केले आहे.

दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान

राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ (Devidas Kulal) यांनी ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा (Written Exam) २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा काही दिवस लवकर परीक्षा होणार आहे. दहावी परीक्षेचे हॉल तिकीट राज्य शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर (Website) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हॉल तिकीटवरील दुरुस्त्या आणि इतर सूचना

हॉल तिकीटावर मुख्याध्यापक (Headmaster) यांचा शिक्का (Seal) उमटवून स्वाक्षरी (Signature) करावी. हॉल तिकिटावर फोटो सदोष (Defective Photo) असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य (Principal) यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

हॉल तिकीट विद्यार्थ्याकडून गहाळ (Lost) झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा त्याची प्रिंट काढून त्यावर लाल शाईने (Red Ink) “द्वितीय प्रत” म्हणजे “डुप्लिकेट” (Duplicate) असे नमूद करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. हॉल तिकिटातील दुरुस्त्या (नाव, आईचे नाव, जन्मतारीख) ऑनलाइन पद्धतीने करायच्या आहेत. त्यासाठी दुरुस्ती शुल्क (Correction Fees) भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे (Divisional Board) मान्यतेसाठी सादर कराव्यात. (SSC Exam Hall Tickets )

विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर सुधारित हॉल तिकीट उपलब्ध होईल. विषय (Subject), माध्यम (Medium) बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात संपर्क साधून दुरुस्त्या कराव्यात, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Title : SSC Exam Hall Tickets to be available online from January 20

महत्वाच्या बातम्या- 

…म्हणून पुरूष स्वतःची बायको सोडून दुसऱ्यांच्या बायकोंकडे पाहतात, अजब कारण समोर

सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर!

गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये नेलं, व्हायग्रा घेतली अन्…, अत्यंत धक्कादायक प्रकार समोर

वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत आणखी एक खुलासा, दुसऱ्या पत्नीच्या नावावर…

‘हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही’; करिनाचा धक्कादायक खुलासा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .