10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना बसणार फटका; परीक्षेबाबत शिक्षणमंडळाने घेतला मोठा निर्णय

CBSE

SSC HSC Board Exam l दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण मंडळाकडून परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कारण कागदाच्या किंमती महागल्यामुळे यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात तब्बल बारा टक्के वाढ करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती :

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक सर्वात महत्त्वाची बातमी आहे. बारावीच्या फेब्रुवारी- मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच 1 ते 30 ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज भरू शकणार आहेत. यासंदर्भात शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

शिक्षण मंडळाच्या नव्या वाढीव परीक्षा शुल्कानुसार आता दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक परीक्षा शुल्क भरावी लागणार आहे. त्यामुळे आता पालकांवर देखील अधिकच भार पडणार आहे.

SSC HSC Board Exam l परीक्षा शुल्कात वाढ :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या वर्षीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात तब्बल 12 टक्क्याने वाढ केली आहे. कारण दरवर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे कागदाच्या किमतीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे ही शुल्क वाढ करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यंदाच्या वर्षांपासून विद्यार्थ्यांना आता दहावी परीक्षेसाठी 420 ऐवजी 470 रुपये मोजावे लागणार आहेत. तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 440 रुपये ऐवजी 490 रुपये एवढे परीक्षा शुल्क पालकांना भरावे लागणार आहेत. दरम्यान या वाढीव शुल्कासह प्रशासकीय शुल्क, प्रमाणपत्र शुल्क, गुणपत्रिका शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कात देखीलवाढ करण्यात आली आहे.

News Title : SSC HSC Board Exam Fee Increase

महत्वाच्या बातम्या –

सूरजच्या कुटुंबियांच्या ‘त्या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं!

1 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम?

‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ यांची चिंता करू नये; भाजप नेत्याचा पलटवार

‘मुंबई’ पुन्हा टार्गेट ? दहशतवादी हल्ल्याचा कट

लग्नाच्या काही महिन्यातच सोनाक्षी नवऱ्याला त्रासली?, धक्कादायक खुलासा समोर

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .