SSC Result 2024 | बारावीचा निकाल लागला आहे. आता दहावीच्या निकालाची देखील तारीख जाहीर झाली आहे. बोर्डानं बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत होते. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारिख जाहीर केली आहे. दहावीचा निकाल सोमवारी 27 मे रोजी लागणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थी आपला निकाल बघू शकतात.
‘या’ तारखेला लागणार निकाल
विद्यार्थी mahasscboard.in किंवा mahresult.nic या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. मात्र निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक, आईचे नाव, रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो.
राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांसह (SSC Result 2024) त्यांच्या पालकांचं लक्ष दहावीच्या निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. आता तारीख जाहीर झाल्याने ही चिंता मिटली आहे.
निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार?
दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील काही भागात अकरावीचा प्रवेश ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येतो. मुंबईसह काही शहरांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच प्रवेश करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे काढून ठेवावी. नवीन प्रवेश घेण्यासाठी काही नवीन कागदपत्रे देखील काढावी लागतात. त्यामुळे वेळ वाया न घालवता आता (SSC Result 2024) पासूनच सर्व तयारी करून ठेवावी.
News Title : SSC Result 2024
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यानंतर नागपुरातही ‘हिट अँड रन’, मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं
काळजी घ्या! राज्यातील ‘या’ भागांमध्ये उष्णतेची लाट येणार
उद्धव ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला, ‘या’ नेत्याचं निधन
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
अग्रवालांनी ड्रायव्हरला डांबून ठेवलं!, धक्कादायक घटनाक्रम आला समोर; पोलिसांकडून आता आजोबाला अटक