बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

मुंबई | इंदौरहुन (Indore) अंमळनेरला (Amalner) येत असलेल्या एसटी महामंडळ (State Transport Bus) बसचा सोमवारी सकाळी मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) अपघात झाला. धार जिल्ह्यातील घागरगाव येथे ही बस नर्मदा नदीत कोसळली. आतापर्यंत प्राप्त आकड्यांनुसार यातील 13 प्रवाशांचा दुर्देैवी मृत्यू झाला आहे. ही बस अमळनेरला येत असल्याने यात महाराष्ट्रातील किती प्रवासी होते, हे अद्याप कळालं नाही. प्रशासन आणि स्थानिकांकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे.

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी यासंदर्भात माहिती दिली. एसटी महामंडळाची ही बस जळगाव जिल्ह्यातील होती. सकाळी 7:30 वाजता ही बस मध्य प्रदेशवरुन निघाली होती. ही बस इंदौरवरुन अमळनेरला येणार होती. मात्र धार जिल्ह्यात नर्मदा नदीच्या पुलावरुन जाताना ही बस नदीत कोसळली.

मृतांच्या आणि जखमींच्या कुटूंबीयांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक (Helpline Number) सुरु करण्यात आले आहेत. या भीषण अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने नदीच्या पाण्याला जोर आहे आणि प्रवाह वेगाने पुढे जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार या एसटीत 50 – 55 लोक होते. यापैकी तेरा लहान मुले देखील आहेत.

उर्वरीत लोकांचा तपास सुरु असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauvhan) यांना फोन करुन तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. या बसचा क्रमांक MH 40 N 9848 आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफचे (NDRF) पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

गेले ते बेंटेक्स,राहिले ते सोने म्हणणारे खासदार स्वत:च शिंदे गटात; ‘या’ कारणामुळे दिला सेनेला धक्का

मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटिओ टेस्टची गरज नाही, वाचा सविस्तर

‘मी तर स्वत:लाच मुख्यमंत्री समजतो’, शिंदे गटातील आमदाराचं मुख्यमंत्र्यांसमोरच मोठं वक्तव्य

‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनने झाप झापलं, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More