बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं आत्महत्या सत्र सुरूच; आता ‘ही’ घटना आली समोर

लातूर | बसचालकांच्या आत्महत्येच्या घटना वारंवार घडत असतानाच आता अजून एका एसटी बसचालकाने बसमध्येच आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ही घटना घडली आहे. संजय केसगिरे असे या आत्महत्या केलेल्या एसटी बसचालकाचे नाव होेते. बॅगच्या बेल्टने गळफास लावून केसगिरे यांनी आत्महत्या केली. केसगिरे यांच्या आत्महत्येने त्यांच्या सहकाऱ्यांसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी दुपारी उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना बसचालक संजय केसगिरे हे बसमध्येच थांबले. काही वेळाने त्यांनी बॅगच्या बेल्टच्या साहाय्याने फाशी लावून घेतली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने केसगिरे यांना रुग्णालयात हलवलं. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच केसगिरे यांचा मृत्यू झाला होता. केसगिरे यांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही.

यायाधीही एसटी बसचालकांच्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एका एसटी बसचालकाने  डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने आत्महत्या केली होती. सुभाष तेलोरे असं या बसचालकाचं नाव होतं. संगमनेर बस स्थानकावर बस मुक्कामी थांबलेली असताना त्यांनी बसमध्येच गळफास घेत आत्महत्या केली होती.

तर धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एसटी बसचालकाने वेळेवर पगार मिळत नसल्याने आलेल्या अडचणींना कंटाळून आत्महत्या केली होती. कमलेश बेडसे असे या आत्महत्या केलेल्या बसचालकाचे नाव होते. त्यातच आता केसगिरे यांच्याही आत्महत्येची बातमी समोर आल्याने खळबळ माजली आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना वारंवार घडत असल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, रेव्ह पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ आला समोर

राहुल गांधींना त्यांच्याच मतदारसंघातून धक्का, आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा

प्रार्थनास्थळांचे दरवाजे उघडले पण ‘या’ लोकांना प्रवेश नाहीच; काय आहे नवी नियमावली?

देशातील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच; 7 महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या

पुढील 4-5 दिवस ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More