बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी संपात फूट! संप मागे घेण्याच्या घोषणेनंतरही कर्मचारी संपावर ठाम

मुंबई | एसटी संपानं राज्यातील वातावरण चांगलंच पेटवलं होतं. आझाद मैदान येथे गेल्या दीड महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्यातील विविध आगाराबाहेरही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. अशातच काल एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपा मागे घेण्याची मोठी घोषणा केली होती.

एसटी कर्मचारी संघटनेने 21 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य सरकारला सर्वात आधी संपाची नोटीस दिली होती त्या संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. अजय गुजर यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतरही कर्मचारी मात्र संपावर ठाम असल्याचं पहायला मिळत आहे.

कर्मचाऱ्यांनी 22 डिसेंबरपासून रात्री 12 वाजेपासून कामावर रुजू व्हावे. एसटी संपाची नोटीस आम्ही दिली होती. त्यामुळे आमची संघटना संप मागे घेत आहे, अशी घोषणाही अजय गुजर यांनी केली. अजय गुजर यांनी माघार घेतली तरी त्यांना डावलून हा संप सुरुच राहणार असल्याची भूमिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे.

दरम्यान, दोन दिवसांत एसटी सेवा पूर्ववत होईल, अशी आशा प्रशासनाला आहे. मात्र कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत. आझाद मैदानात उपस्थित कर्मचाऱ्यांनी यातून माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

अखेर चिंता मिटली! Omicron बाबत दिलासादायक माहिती आली समोर

एसटी संप मागे! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची मोठी घोषणा

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच; पेपर फुटीनंतर नवी तारीख जाहीर

‘…कदाचित खूप उशीर झाला आहे’; Omicron बाबत धक्कादायक माहिती आली समोर

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More