मुंबई | ज्या चालकांची 25 वर्षे विना अपघात सेवा झाली आहे, अशा चालकांना यापुढे राज्य स्तरावर सत्कार करून, 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
एसटी महामंडळाकडून 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान रस्ते सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचं उद्घाटन अनिल परब यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल आगार येथे पार पडलं. यावेळी ते बोलत होते.
चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्यांचेही आपण कौतुक करायला पाहिजे, असं परब म्हणाले.
ज्या चालकांनी 25 वर्ष विना अपघात सेवा दिली आहे. त्यांना यापुढे 25 हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, असं परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलंय.
थोडक्यात बातम्या-
“उद्धव ठाकरे यांनी कधीच बाहुबलीचं राजकारण केलं नाही”
उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण…- देवेंद्र फडणवीस
“ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन”
‘या’ गावात सुनेने सासूचा तर जावयाने सासऱ्याचा केला पराभव!
वादात सापडलेल्या ‘तांडव’ वेबसीरिजच्या दिग्दर्शकाने मागितली माफी!