जळगाव | मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगावमधील एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
वेतन न मिळाल्यानं जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मनोज चौधरी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
मनोज चौधरी यांनी मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी जळगाव डेपो बंद ठेवत निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकलो नाही ही खरंच शरमेची गोष्ट
‘त्या’ वक्तव्यावर खडसेंनी माफी मागावी अन्यथा…; ब्राम्हण महासंघाचा इशारा
राज्यपाल कोश्यारींचा गृहमंत्र्यांना फोन; अर्णब गोस्वामींच्या प्रकृती आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त
‘ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या’; मुंबई पालिकेचं आवाहन
लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय