बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारची बदनामी केल्यानं एसटी कर्मचाऱ्याचं निलबंन!

यवतमाळ | सोशल मीडियावर हे आपलं मत अभिव्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. राजकीय, सामाजिक आणि इतर विषयांवर नेटकरी आपलं मत व्यक्त करत असतात. गेल्या काही वर्षात केंद्र सरकार अधिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचं म्हटलं जात होतं. आता तोच ठपका राज्यातील ठाकरे सरकारवर लागण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलंय एका एसटी कर्मचाऱ्याचं निलंबन.

राज्यातील ठाकरे सरकार विरोधात आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं एका एसटी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर लिहिलेली आक्षेपार्ह पोस्ट पाहून या कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रविण लढी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्याने एका व्हॅट्स अॅप गृपवर ही आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.

महावसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला. ऑक्सिजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही. 100 कोटी वसुली सरकार असल्याचं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बदनामी झाल्याचं यवतमाळच्या आगार प्रशासनाने म्हटलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याची चौकशी देखील होणार आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्याने केलेली पोस्ट गंभीर स्वरूपाची असल्याचं यवतमाळ आगार प्रशासनाचं म्हणणं आहे. कर्मचाऱ्याने चौकशीसाठी अडथळा आणू नये म्हणून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करत असल्याचं सांगितलं जात आहे. तर कर्मचारी तपासणीस सहकार्य करत नसल्याचं देखील आगार प्रशासनाच्या पत्रात म्हटलं आहे.

पाहा पत्र-

थोडक्यात बातम्या-

‘बँक बुडाली तर…’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ठोठावला ‘इतक्या’ लाखांचा दंड

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More