बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांनी 120 एसटी कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं”

मुंबई |  राज्याच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा कणा असलेल्या एसटीची देखरेख करणारे कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून संपावर आहेत. अनेक प्रयत्नानंतरही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर माघार घ्यायला तयार नाहीत. अखेर संतप्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर हल्ला केला आहे.

सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानावर कर्मचाऱ्यांनी चप्पल आणि दगडांनी हल्ला केला आहे. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार यांनीच विलिनीकरण होऊ दिलं नाही. त्यांनीच अडथळा आणला, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

120 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला शरद पवारच जबाबदार आहेत. त्यांनीच आमचं कुंकु पुसलं आहे, शरद पवार हाय हाय, अशा प्रकारची घोषणाबाजी उपस्थित कर्मचारी करत होते. आमची विलिनीकरणाची मागणी पुर्ण नाही झाली तर आम्ही बारामतीतही आक्रोश करणार आहोत, असा इशारा संपकरी कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान,  शरद पवारांवर हल्ला करण्याचा प्लॅन अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा होता, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. परिणामी आता मुंबई पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

ST कर्मचाऱ्यांचा पवार कुटुंबीयांना घेराव; सुप्रिया सुळेंची आंदोलकांना हात जोडून विनंती, म्हणाल्या…

ईडीच्या कारवाईवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

राहुल गांधींचा मोठा दावा म्हणाले, “श्रीलंकेसारखं भारतातील सत्य देखील…”

Raj Thackeray : “राज ठाकरेंना अटक करून तुरूंगात टाका”

वसंत मोरेंना पदावरून काढताच रूपाली ठोंबरेंचा धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More