बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी संप: “आता माघार नाही, जी कारवाई करायची ती करा”

नागपूर | राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Worker) संपानं वातावरण चांगलंच तापवलं होतं. यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळाली. अशातच राज्य सरकारनं फक्त एक विलिणीकरणाची सोडून कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य सरकारने कर्मचा-यांना आज कामावर हजर न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देिला आहे.

महिन्याभरापासून संप सुरु असून आता राज्य सरकारनं इशारा दिल्यावर अनेक ठिकाणी संप थांबवला आहे. पुन्हा एसटी सुरु करण्यात आली आहे. अशातच नागपूर येथील एसटी कर्मचारी विलिणीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

याशिवाय आम्हाला अल्टीमेटम द्यायला आम्ही नक्षलवादी किंवा ड्रग्स विक्री करणारे नाही आहोत, असं म्हणत पुण्यातील एसटी कर्मचा-यांनी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलंय.

दरम्यान, संप थांबवण्यासाठी आता राज्य सरकारने कडक पावले उचलायला सुरूवात केली आहे. सरकारनं कितीही कारवाईची भीती दाखवली तरी जोपर्यंत विलनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय. आता यावर राज्य सरकार काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…म्हणून ‘या’ मार्गानं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय”

“शरद पवारांचा पक्ष बनला तेव्हापासूनच ‘ते’ पंतप्रधान पदाचं स्वप्न बघत आहेत”

तब्बल 21 वर्षांनी भारतानं जिंकला Miss Universeचा खिताब; ‘ही’ व्यक्ती ठरली मानकरी

‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावरुन संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल, भाजपचा आक्रमक पवित्रा

अभिनेत्री नोरा फतेही ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात?; ‘त्या’ व्हायरल फोटोंनी वाढवली उत्सुकता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More