बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी संप: कर्मचारी आज कामावर रुजू न झाल्यास होणार ‘ही’ मोठी कारवाई

मुंबई | एसटी संपाचा (S.T Sump) तिढा काही संपायचं नाव घेईना. दिवसागणिक संप चिघळत चालला असून सरकारही संपामुळे चिंतेत आहे. यातच काही आगारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही आगारातील कर्मचारी अजूनही संप मागे घेण्यास तयार नाहीत. याच पार्श्वभूमावर आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना (S.T Worker) कामावर रुजू होण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. आज कामावर रुजू न झाल्यास उद्यापासून त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे सरकारनं आता एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे.

कामावर रुजू न झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांची आजपासून बडतर्फी करण्यात येणार आहे. त्यामुळे कामावर रुजू होण्यासाठी आज अंतिम मुदत दिली आहे. बडतर्फीसारख्या कारवाईला उद्यापासून सुरुवात होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

दरम्यान, कारवाईला सामोरं जाण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं, असं आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता कर्मचारी हे शेवटचं आवाहन ऐकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC कशी करायची? वाचा सविस्तर

राजकारणातील गुन्हेगारीला आळा बसणार; निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेतील तिसरा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर

‘स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा नकला कराव्या लागत आहे’; दानवेंची सरकारवर बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More