बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ST Strike: “सरकार आमचे म्हणणे मान्य करत नसेल, तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी”

नाशिक | एसटी संप (ST Strike) काही मागे हटवण्याचं नाव घेईना. दिवसेंदिवस हा संप चिघळतच चालला आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. यातच काही आगारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही आगारातील कर्मचारी अजूनही संप मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच आता विलिनीकरणाच्या मुद्द्यांवरुन काही कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मरण्याची मागणी व्यक्त केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केल्या असल्या तरी एका विलिनीकरणाची मागणी अजून बाकी आहे. त्यामुळे सध्या त्या मुद्द्यावरुनच वातावरण तापलं आहे. आता विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर आहेत. नाशिकमधील सर्वच्या सर्व 13 डेपोंमधील कर्मचाऱ्यांनीदेखील संपात सक्रिय सहभाग घेतला आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी 98 टक्के कर्मचारी अद्यापही संपावर आहेत. त्यामुळे आता न्याय मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य आल्यानेच ते आत्महत्या करीत आहे. राज्य सरकार आमचे म्हणणे मान्य करत नसेल, तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी 269 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, सरकारनं अनेकदा अल्टिमेटम देऊनही एसटी कर्मचारी आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे प्रवाशांचे तर हाल होत आहेत आता सरकारचंही टेन्शन वाढलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

आनंद महिंद्रांचा दिलदारपणा; हात-पाय नसलेल्या ‘त्या’ व्यक्तीला दिली नोकरीची ऑफर

सोनं-चांदीच्या दरात वाढ, वाचा आजचे ताजे दर

“…अन्यथा नारायण राणे यांचा जसा राजकीय अंत झाला, तसाच त्यांच्या मुलांचाही होईल”

कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना – नारायण राणे

“नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित आहे, पण मी का सांगू?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More