मुंबई | राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. विलिनीकरणासह इतर मागण्यांवर सरकारनं ठोस पाऊल न उचलल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर धडक दिली.
मोठ्या संख्येनं अचानकपणे आलेल्या कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी चप्पल, दगड फेकले आहेत. घरात शरद पवार, प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंची मुलगी उपस्थित आहेत. परिणामी राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
सुप्रिया सुळेंनी तात्काळ सिल्वर ओककडं धाव घेतली मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना आडवलं. पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी कडं करत त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. तेथुन त्यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केलं आहे. शांतपणे आपली मागणी मांडण्याची विनंती सुप्रिया सुळेंनी हात जोडून केली आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर लागलीच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांना बारामतीत चर्चेचं आव्हान दिलं होतं. त्याअगोदरच हा गोंधळ झाल्यानं राज्य पोलीस दलावर जोरदार टीका होत आहे.
थोडक्यात बातम्या –
राहुल गांधींचा मोठा दावा म्हणाले, “श्रीलंकेसारखं भारतातील सत्य देखील…”
Raj Thackeray : “राज ठाकरेंना अटक करून तुरूंगात टाका”
वसंत मोरेंना पदावरून काढताच रूपाली ठोंबरेंचा धक्कादायक खुलासा
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयचा नवा खुलासा, धक्कादायक माहिती समोर
मोठी बातमी! अमेरिकेचा रशियाला जोरदार झटका
Comments are closed.