लोकार्पण सोहळ्याच्या विरोधात होणार होतं आंदोलन; मात्र…

गांधीनगर | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्याची तयारी करणाऱ्या 16 आदिवासी नेत्यांना मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पुतळ्यासाठी आदिवासींच्या जमिनी हडप केल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. 

भिलीस्तान ट्रायबल सेना आणि भारतीय ट्रायबल पार्टी या दोन संघटनांनी या आंदोलनाची तयारी केली होती. तसंच अनेक आदिवासी गावांमध्ये चुल्हा बंद आंदोलनही करणार होते. 

आमचा विरोध सरदार पटेलांना नाही. याउलट आम्हाला त्यांचा अभिमान आहे. मात्र गोरगरीब आदिवासींच्या जमिनी घेऊन भाजप जे राजकारण करते आहे त्याला आमचा विरोध आहे, असं या संघटनांचं म्हणणं आहे. 

दरम्यान,या पुतळ्यामुळे साधू बेटावरील आदिवासींना काय फायदा होणार आहे?, अशा सवाल मोदींना त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आर. आर. आबांच्या पत्नी सुमनाताईला जिल्हाधिकाऱ्यांकडून सापत्नभावाची वागणूक!

-सरदार पटेलांमध्ये शिवाजी महाराजांचं शौर्य होतं- नरेंद्र मोदी

-देशाच्या महापुरुषांचा गौरव करणं हा गुन्हा आहे का?; मोदींचा सवाल

-रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशीच

-जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं मोदींच्या हस्ते लोकार्पण

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या