बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजेश टोपे जालन्याचे आरोग्यमंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”

मुंबई | एकीकडे कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. तर दुसरीकडं लसीकरणाच्या मुद्यावरुन राजकारण तापत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जालना जिल्ह्याला जास्त लसी मिळाल्याच्या मुद्दयावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्राकडून मिळालेल्या 26.77 लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?, असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधताना महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना लसींचं मनमानी पद्धतीनं वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचं फक्त राजकारण करायचं आहे. त्यामुळेच हा विषय न्यायालयात टिकला नाही. मराठा समाजावर खूप मोठा अन्याय झाला आहे, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या

…म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला- अशोक चव्हाण

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ममता बँनर्जी व राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात वाक् युद्ध

मराठा आरक्षणप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला हा महत्त्वाचा सल्ला!

मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी जोडले केंद्र सरकारसमोर हात; केलं ‘हे’ आवाहन

पुण्याला मिळाला लसींचा मोठा साठा; उद्यापासून सुरू होणार 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More