शिवसाठी एमसी स्टॅन भावूक; म्हणतो शिव माझ्या…
मुंबई | रविवारी बिग बाॅस 16 चे(Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले पार पडले. या सीझनचा विजेता एमसी स्टॅन(MC Stan) ठरला आहे. त्यामुळं एमसी स्टॅनचे चाहते तर खुश आहेत पण उपविजेता ठरलेल्या शिव ठाकरेचे(Shiv Thakare) चाहते मात्र नाराज आहेत.
एमसी स्टॅन जरी जिंकला असला तरी शिव ठाकरेच आमच्यासाठी खरा विजेता आहे, असे शिवचे चाहते म्हणत आहेत. त्यातच आता एमसी स्टॅनसुद्धा शिवसाठी नाराज आहे असं दिसत आहे. तशी प्रतिक्रियाही एमसी स्टॅननं दिली आहे.
नुकतेच एका मुलाखतीत एमसी स्टॅन म्हणाला आहे की, जिंकलोय त्यामुळं खूप छान वाटत आहे. पण शिवसाठी वाईट वाटत आहे. पुढं बोलताना स्टॅन असंही म्हणाला की, शिव समजून घेईल आणि त्यानं समजून घेतलंही आहे. परंतु तो माझ्या जागी असायला पाहीजे होता.
बिग बाॅसची ट्राॅफी जिंकणं हे त्याचं स्वप्न होतं. त्यामुळं शिवसाठी मला वाईट वाटत आहे. अशा शब्दांत स्टॅननं शिवबद्दल भावना व्यक्त केल्या. यातून स्टॅनचं शिवबद्दल मैत्रीप्रेम दिसून येत आहे.
दरम्यान, शिव आणि स्टॅन चांगले मित्र आहेत. फिनाले दिवशी स्टॅनला विजेता म्हणून घोषित केल्यानंतर शिवनेही स्टॅनला खांद्यावर उचलून घेतले होते. त्यामुळं हे दोघं खऱ्या मैत्रीचं एक उत्तम उदाहरण ठरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.