स्टॅनचं करावं तेवढं कौतुक कमीच; बक्षिसाच्या पैशातून करणार ‘हे’ महत्त्वाचं काम

मुंबई | बिग बाॅस 16 चं(Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले गेल्या रविवारी पार पडलं. या सीझना विजेता एमसी स्टॅन(MC Stan) ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र स्टॅनची चर्चा रंगली आहे.

एमसी स्टॅन विजयी ठरल्यानंतर त्याला बक्षिस म्हणून एक अलिशान कार आणि तब्बल 31 लाख रूपये मिळाले आहेत. त्यामुळं स्टॅनला तो या पैशांचं काय करणार आहे, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

स्टॅननं या पैशांतून आपण आईसाठी घर घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्ही अजूनही भाड्याच्या घरात राहतो आणि माझ्या आईच्या आशिर्वादामुळंच मी विनर ठरलो, म्हणूनच मी या पैशांतून आईसाठी घर घेणार आहे, असं स्टॅन म्हणाला आहे.

दरम्यान, एमसी स्टॅन पुण्यातील एका लहान वस्तीत मोठा झाला आहे. त्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. एकवेळ अशीही होती की, स्टॅनकडं राहायला घर नव्हतं आणि दोन वेळचं जेवणही नव्हतं. पण आता स्टनमुळं त्याच्या कुटुंबाचे दिवसही बदलले आहेत.

एमसी स्टन आपल्या आईसाठी घर घेणार असल्याची माहिती समजताच अनेकजण त्याचं कौतुक करत आहे. सोशल मीडियावरही कमेंट्सच्या माध्यमातून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-