बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदीजी, भारतात असुरक्षित वाटत असेल तर पाकिस्तानात जा”

नवी दिल्ली | पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्यानं पंतप्रधानांनी दौरा रद्द केला होता. त्यानंतर या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भाजप नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरु आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध कॉमेडीयन कुणाल कामरा (Standup Comedian Kunal Kamraa) यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

‘ज्यांना भारतात राहायला असुरक्षित वाटत असेल त्यांनी पाकिस्तानात जावं’, असा टोला कुणाल कामरा याने ट्विटरवरून लगावला आहे. भाजप विरोधात वक्तव्य करणाऱ्या अनेकांना भाजप नेत्यांनी डिबेट शो मधून किंवा इतर ठिकाणी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून कुणाल कामरा याने मोदींना टोला लगावला आहे.

कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहे. तो अनेकवेळा त्याच्या कॉमेडीच्या माध्यामातून भाजप आणि मोदींवर टीका करताना दिसतो. त्याचबरोबर सोशल मीडियावरही तो मोदींच्या विरोधात पोस्त करताना दिसतो. त्याने मोदींविरोधात अनेक मीमही फेसबुक तसेच ट्विटरवर शेअर केले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा होणार होती. मात्र, नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना सभा रद्द करावी लागली. आंदोलकांनी मोदींचा ताफा अडवल्यानं नरेंद्र मोदी 15 ते 20 मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले होते. त्यामुळे पंतप्रधानांनी सभा रद्द करत विमानतळावर माघारी जाण्याचा निर्णय घेतला.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

‘त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत कोणी पोहचवलं?’, स्मृती इराणींचे काँग्रेसवर गंभीर आरोप

“… मी जिवंत पोहचू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा”

धक्कादायक! संजय राऊतांच्या घरी कोरोनाचा शिरकाव, चार जणांना कोरोनाची लागण

पुढील चार दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागात अलर्ट जारी

मोठी बातमी! राज्यातील सर्व महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More