बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! शिखर धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट

मुंबई | क्रिकेट जगतात शिखर धवन याला गब्बर म्हणून ओळखलं जातं. आपल्या खाजगी आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे सध्या गब्बर चर्चेत आहे. शिखर धवन आणि आयेशा धवन-मुखर्जी यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयेशा मुखर्जीने इंन्स्टाग्राम पोस्ट लिहून याचा खुलासा केला आहे.

शिखर धवनने आपल्या पेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या आयेशा सोबत 2013 साली लग्न केलं होत. नऊ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि आयेशाच्या घटस्फोटामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. याआधीही तिचा घटस्फोट झाला होता. आयेशाने इंन्स्टाग्राम वर एक भावनिक पोस्ट करत घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं.

आयेशा मुखर्जी आणि धवन यांना झोरावर नावाचा मुलगा आहे. आयेशाला पहिल्या दोन मुली आहेत. आयेशाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, घटस्फोट घेण्याअगोदर घटस्फोट हा शब्द मला खूप घाण वाटायचा. पहिल्यांदा जेव्हा मी घटस्फोट घेतला तेंव्हा मला प्रचंड भिती वाटली. अन् आता सुद्धा तीच भावना माझ्या मनात आहे. माझं खूप काही पणाला लागलं आहे. पण आता मी दुसऱ्यांदा घटस्फोट घेत आहे, असंही आयेशा मुखर्जीने पोस्टमध्ये म्हटलंय.

आयेशा मुखर्जी सध्या मेलबर्नमध्ये आपल्या दोन मुलींसह रहाते. शिखर धवनच्या बाजुने अजून कसलाही खुलासा याबाबत करण्यात आला नाही. पण आता सर्वत्र या घटस्फोटाची चर्चा आहे. आयशा मुखर्जीने आपल्या सोशल मिडीया अकांऊटवरून शिखर धवनचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.

थोडक्यात बातम्या

“आता दयामाया नाहीच, फेरिवाल्यांचा उच्छाद अटोक्यात आणावाच लागेल”

“बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्यावर भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटले, हे दु:ख टोचणारं”

“आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘….तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का?’; मायावतींचं भागवतांवर टीकास्त्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More