बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणासाठी नियंत्रण कक्ष सुरु; ‘या’ क्रमांकावर संपर्क करुन मिळवा इंजेक्शन

पुणे | पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर या इंजेक्‍शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचीही या इंजेक्शनमुळे मोठी धावपळ होत आहे.

याच पार्श्‍वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी इंजेक्शनचं वितरण सुरळीत व्हावं यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणासाठी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. कोरोनासारख्या गंभीर संकटाला तोंड देत असताना इंजेक्शन अभावी कोणाचाही जीव जाऊ नये. यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष उभारून दोन नंबर जारी केले आहेत ज्यावर कॉल करून रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन मिळवू शकतात.

जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या नियंत्रण कक्षाचे नंबर पुढीलप्रमाणे आहेत. 020-26123371 तसेच 1077 या नंबरवर संपर्क साधून रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असलेल्या रुग्णांना ते तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल. हे केंद्र 31 मे 2021 पर्यंत सुरू ठेवणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने नुकतीच रेमडेसिवीर इंजेक्शनची होणारी निर्यात बंद केली आहे. तसेच महाराष्ट्रात या इंजेक्शनचा तुटवडा होत असून अनेक ठिकाणी त्याचा काळाबाजार सुरू असल्याचं निदर्शनास आल्याने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. पुण्यातील या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. तसेच याद्वारे इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यास प्रशासनाला नक्कीच यश येईल असं मत व्यक्त केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या

“अडवानी गांधीनगरचे खासदार होते म्हणून भाजपने 6 वेळा माझं तिकीट कापलं”

मुख्यमंत्र्यांचं ठरलं; महाराष्ट्रात 8 दिवसांचा कडक लाॅकडाऊन?

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा दावा, खरं कारण समोर आल्यावर पोलिसही हादरले

आयटी कंपनीतील तरुणीला गुंगीचं औषध देऊन कॅब चालकाने केला ‘हा’ प्रकार; पुण्याला हादरवणारी घटना

“फक्त एक राजाच चांगलं शासन करू शकतो, चंगू मंगु नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More